आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ४ ते ८ ऑक्टोबरला नुसत्या डोळ्यांनीही पाहता येणार
मुंबई दि.०४ :- पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने फिरणारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे,
४ ऑक्टोबरला संध्याकाळी ७.०३ वाजता क्षितिजापासून १४ अंशावर उत्तर ते पूर्व दिशेला दीड मिनिटापर्यंत हे दिसेल.
स्लाईड शोमधून उलगडणार तमाशा आणि वारी!
५ ला. रात्री ७.५० वाजता, २८ अंशावर वायव्य ते उत्तर बाजूस पावणे दोन मिनिटे, ६ तारखेला रात्री ७.०२ पासून साडेचार मिनिटांपर्यत ५४ अंशावर वायव्य ते आग्नेय दिशेला पाहता येणार आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर
७ रोजी रात्री ७.५२ वाजता पश्चिम ते नैॠत्य बाजूला क्षितिजाजवळ पावणेतीन मिनिटे १३ अंशावर आणि ८ ऑक्टोबरला रात्री ७.०३ वाजता पश्चिमेकडून दक्षिणेकडील आकाशात हे स्थानक पाहता येईल.
सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्यांच्या विरोधात प्रत्येक मंदिरातर्फे तक्रार दाखल करणार
१६ देशांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक तयार केले असून याचा आकार फूटबॉलच्या मैदानापेक्षा मोठा आहे. सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर हे स्थानक एका दिवसात पृथ्वीच्या पंधरा प्रदक्षिणा पूर्ण करते.