मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर दर बुधवारी नागरिकांशी संवाद साधणार
मुंबई दि.०४ :- मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर दर बुधवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते १२.४५ तर बृहन्मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दुपारी १ ते ४ या वेळेत ते उपस्थित राहणार आहेत.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ कार्यक्रमाचे आयोजन
नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विषयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच इतर विषयांसाठी बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात उपस्थित राहता येईल, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठक असल्यास पालकमंत्री गुरूवारी उपस्थित राहणार आहेत.