भविष्य निर्वाह निधीच्या रकमेसाठी आंदोलनाचा इशारा
मुंबई दि.०४ :- महावितरण कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार काम करत आहेत. कंत्राटी कामगारांना येत्या २३ ऑक्टोबरपूर्वी भविष्य निर्वाह निधी, अंशदानातील अनियमिता याची पूर्तता न झाल्यास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे (संलग्न भारतीय मजदूर संघ) भविष्य निर्वाह निधी आयुक्त
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर दर बुधवारी नागरिकांशी संवाद साधणार
कार्यालयसमोर आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे देण्यात आला आहे. आकुर्डी येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर संघातर्फे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी हा इशारा दिला.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ कार्यक्रमाचे आयोजन
पुण्यातील कोथरुड विभागातील कंत्राटी कामगारांच्या वेतनातून दरमहा भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची वजावट करून ती रक्कम भरण्यात आली नव्हती. या प्रकरणी संघटनेने आकुर्डी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती.