डॉ. प्रकाश खांडगे यांना शाहीर कृष्णराव साबळे पुरस्कार जाहीर
डोंबिवली दि.०४ :- यशराज कला मंचतर्फे लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांना शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यशराज कला मंचचे संस्थापक अध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली. महाराष्ट्रातील लोककलांचा अभ्यास, प्रचार-प्रसार करण्यात, त्या रुजविण्यात प्रा. खांडगे यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली आहे.
सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्यांच्या विरोधात प्रत्येक मंदिरातर्फे तक्रार दाखल करणार
त्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी डोंबिवली पूर्व येथील ब्लॉसम आंतरराष्ट्रीय शाळेच्या सभागृहात संध्याकाळी सात वाजता डॉ. खांडगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद – पुढील पावसाळ्यापर्यतची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली
याच कार्यक्रमात डोंबिवली जिमखान्याचे विश्वस्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मधुकर चक्रदेव यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमापूर्वी यशराज कला मंचतर्फे लोककलांच्या नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.