ठळक बातम्या

वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.०४ :- राज्य शासनाला वारकरी बांधवांविषयी आत्मियता,आदर, सन्मान आहे. वारकऱ्यांच्या मागण्यांबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्री दादाजी भुसे समन्वयक म्हणून काम करतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितले. mराज्यातील वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

डॉ. प्रकाश खांडगे यांना शाहीर कृष्णराव साबळे पुरस्कार जाहीर

शिष्टमंडळात ह.भ.प. संदिपान शिंदे, ह.भ.प. आसाराम बडे, ह.भ.प. शिवाजी काळे, ह.भ.प. संतोष सुंबे, बालाजी भालेराव, ह.भ.प. रामेश्वर शास्त्री, ह.भ.प. आदिनाथ शास्त्री, ह.भ.प. हरिदास हरिश्चंद्र यांच्यासह वारकरी बांधवांचा समावेश होता. श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर हे शासनाच्या ताब्यातच रहावे,संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे आळंदी येथील ‘पूज्य सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत निवास, कीर्तन भवन, शिक्षण वर्ग, भजन हॉल करिता ४७ कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा यासह विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍यांच्या विरोधात प्रत्येक मंदिरातर्फे तक्रार दाखल करणार

मंत्री दादाजी भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड यांच्यासह आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, वारकरी प्रबोधन महासमिती, वारकरी महामंडळ,वारकरी प्रबोधन महासमिती, संत मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर, वारकरी महामंडळ (नाशिक जिल्हा व श्री वारकरी प्रबोधन महासमिती जिल्हाध्यक्ष), तारकेश्वर गड संस्थान (पाथर्डी, अहमदनगर) यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *