सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्यांच्या विरोधात प्रत्येक मंदिरातर्फे तक्रार दाखल करणार
महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा प्रस्ताव मंजूर
मुंबई दि.०३ :- सनातन धर्माला नष्ट करण्याचे ‘हेट स्पीच’ देणारे उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, ए. राजा आणि निखिल वागळे यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, असा प्रस्ताव ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या तिसर्या राज्यस्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला.
महापालिकेच्या चार हजार आरोग्यसेविकांचे उद्या आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या या बैठकीला राज्यातील महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. ‘जी.एस्.बी.टेंपल ट्रस्ट’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी बैठकीच्या सुरुवातीला महासंघातर्फे गेल्या सहा महिन्यांत झालेले उपक्रम, आंदोलने याची माहिती देण्यात आली.
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा – मैदा, पोह्याचाही समावेश
बैठकीस जी.एस्.बी. टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण कानविंदे, सचिव शशांक गुळगुळे, श्री क्षेत्र थेऊर देवस्थान, सिद्धटेक देवस्थान आणि मोरया गोसावी देवस्थान यांचे विश्वस्त ह.भ.प. आनंद महाराज तांबे, विदर्भ देवस्थान समितीचे अनुप जयस्वाल, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी उपस्थित होते.