निर्मल युथ फाउंडेशनतर्फे गणेश विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन; १७ हजार किलो निर्माल्य जमा
डोंबिवली, दि. २
निर्मल युथ फाउंडेशनतर्फे यंदाही गणेश विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन करण्यात आले. कुंभारखाण पाडा, गणेश घाट जुनी डोंबिवली, देवीचा पाडा, रेतीबंदर, कोपरगाव तलाव, आयरे गाव तलाव, नांदिवली तलाव, भोईर वाडी तलाव या ठीकाणी निर्माल्य गोळा करण्यात आले.
मंडळांकडून यावर्षी सुमारे १७ हजार किलो निर्माल्य आणि ६ हजार ५०० किलो प्लास्टिक जमा करण्यात आले. गेल्या वर्षी सुमारे ३० मेट्रिक टन निर्माल्य गोळा करण्यात आले होते. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
साऊथ इंडियन असोसिएशन, प्रगती महाविद्यालयचे एनएसएसचे स्वयंसेवक, एनसीसी स्वयंसेवक सहभागी झाले होते.
डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन निर्माल्य जलस्त्रोतात टाकण्यात येऊ नये त्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. १५० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून निर्माल्य जमा करण्यात आले.
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संस्थेच्या अध्यक्षा अक्षता शिंदे आणि सहका-यांच्या मदतीने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. जमा केलेले निर्माल्य खत प्रकल्पासाठी दिले जाते.
———-