डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड -२३सह चार नव्या चार ग्रंथाचे प्रकाशन
मुंबई दि.०३ : – डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २३ (इंग्रजी) , जनता ३-३, जनता खास अंक १९३३ आणि इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद (भाग १ व २) या नवीन ग्रंथांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या प्रकाशनप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री, समितीचे सदस्य उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर आदी उपस्थित होते.
निर्मल युथ फाउंडेशनतर्फे गणेश विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन; १७ हजार किलो निर्माल्य जमा
याच कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड ४, खंड १२, खंड १५, खंड १७ (तीन भाग), खंड १८ (तीन भाग), आणि जातीव्यवस्थेचे निर्मुलन या ग्रंथांच्या नव्या आवृत्तींचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने आतापर्यंत डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणाचे २२ खंड प्रकाशित झाले आहेत.