कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
मुंबई दि.२६ :- नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली. कांदाप्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तट रक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या बैठकीतून उपमुख्यमंत्री पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांध्ये बंद ठेवलेली कांदा खरेदी तात्काळ सुरू करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
कुलगुरूंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात- राज्यपाल रमेश बैस
उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार,नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते.