महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तट रक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२६ :- महाराष्ट्राच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाय योजनांसाठी महाराष्ट्र शासनाकडून भारतीय तट रक्षक दलासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
स्वच्छता अभियान ‘लोकचळवळ’ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांच्यासह महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
मध्य रेल्वेवरील चार स्थानकात सिनेडोम उभारणार
या भेटीत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांना महाराष्ट्रातील सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांबाबत माहिती दिली. तट रक्षक दलाच्या रत्नागिरी येथील हवाई सुरक्षा सुविधांचा आढावा सादर केला. विशेषतः वरळी येथील सुविधांचे तत्काळ अद्ययावतीकरण आवश्यक असल्याचे सांगितले.