अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालय बृहन्मुंबई महापालिकेने ताब्यात घ्यावे – राजेश शर्मा
मुंबई दि.२६ :- अंधेरी येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स रुग्णालय सध्या दिवाळखोरीत निघाले असल्याने बृहन्मुंबई महापालिकेने ते ताब्यात घेऊन ‘एम्स’सारखे रुग्णालय तेथे सुरु करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी केली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात शर्मा यांनी ही मागणी केली आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या जागेचा मुळ मालकी हक्क बृहन्मुंबई महापालिकेचा आहे. महापालिकेने ही जागा सेव्हन हिल्स रुग्णालयाला लीजवर दिली आहे.
महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तट रक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महापालिकेने दुसऱ्या कोणत्याही खाजगी कंपनीला ही जागा न देता स्वतः ताब्यात घेतली तर मुंबईत एक प्रशस्त, अत्याधुनिक, सर्व सोयीनियुक्त आरोग्य केंद्र उभे राहू शकते, असेही शर्मा यांनी या पत्रात म्हटले आहे.