गणेशोत्सवानिमित्त बेस्ट उपक्रमातर्फे अतिरिक्त बसगाड्या
मुंबई दि.२० :- गणेशोत्सवानिमित्त मुंबईत होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमातर्फे अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आहे. येत्या २७ सप्टेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
बॅाईज ४’ येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार चित्रपटाचा चौथा भाग प्रदर्शित होणारा
रात्री कुलाबा परिसरातून उत्तर-पश्चिम मुंबईकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूरमार्गे बस चालविण्यात येणार आहेत. बसमार्ग क्रमांक ४ मर्या., ७ मर्या., ८ मर्या., ए – २१, ए – ४२, ४४, ६६, ६९ व सी -४० या बसमार्गावर रात्रीच्या अतिरिक्त बस फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.