विद्यावेतन वाढविण्याची वरिष्ठ निवासी डॉक्टरांची मागणी मंजूर
मुंबई दि.२० :- वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजूर केली असून राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतनात साधारण १० हजार रुपयांनी वाढणार आहे.
बॅाईज ४’ येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार चित्रपटाचा चौथा भाग प्रदर्शित होणारा
निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन आता ८५ हजार रुपये होणार आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जवळपास ३ हजार वरिष्ठ निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. या डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यासाठी ‘मार्ड’कडून दोन वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. त्यासाठी मार्डने आंदोलनही केले होते.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे, विनामूल्य लेझीम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन हे अन्य राज्यातील निवासी डॉक्टरांच्या तुलनेत फारच कमी होते. त्यामुळे विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यातील निवासी डॉक्टरांना ७६ हजार रुपये विद्यावेतन मिळत होते.