ठाकरे गटातील आमदाराला मोठा धक्का! रवींद्र वायकर यांच्यासह पत्नीवर गुन्हा दाखल
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई दि.१५ :- जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नीसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्या विरोधात तक्रार केली होती.
नवी मुंबई महापालिका परिवहन विभागातर्फे बेलापूर ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान विशेष बससेवा
वायकर यांनी मुंबईच्या जोगेश्वरी येथील महापालिकेच्या राखीव भूखंडावर एक पंचतारांकित हॉटेल बांधले असून हॉटेल बांधण्यापूर्वी वायकर यांनी महापालिकेची परवानगी घेतली नव्हती. सुमारे ५०० कोटींचा हा घोटाळा असल्याचे सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठीही बोलाविले होते. आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.