मध्य रेल्वेकडून पाससंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी; प्रवाशांमध्ये नाराजी
मुंबई दि.१५ :- मध्य रेल्वेने पाससंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. लोकल प्रवासादरम्यान पासधारकांना आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना किंवा मतदान कार्ड यापैकी एक मूळ ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन विभागातर्फे बेलापूर ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान विशेष बससेवा
बनावट यूटीएस आणि लोकल पासच्या घटना वाढल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयाला प्रवाशांकडून विरोध होत असून प्रवाशांना नाहक त्रास देण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.