नवी मुंबई महापालिका परिवहन विभागातर्फे बेलापूर ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान विशेष बससेवा
नवी मुंबई दि.१५ :- बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान ३२ विशेष बससेवानवी मुंबई महापालिका परिवहन विभागाने रात्री उशिरा येणाऱ्या उपनगरीय गाड्यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान ३२ विशेष बससेवा सुरू केल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनातर्फे शहरातील हॉटेल्सवर कारवाईचा बडगा
पनवेल स्थानकात १८ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरसाठी दोन ट्रॅक (अप आणि डाऊन) बांधण्याच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने बेलापूर ते पनवेल रात्रीचा ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक येत्या २ ऑक्टोबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या कालावधीत पनवेल स्टेशन यार्डमध्ये रात्रीचे तीन ते चार तासांचे ब्लॉक लागू करण्यात आले आहेत.
अंध व्यक्तींच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ
नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाने रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी या कालावधीत ८ अतिरिक्त बस तसेच बेलापूर ते पनवेल दरम्यान एकूण ३२ विशेष सेवा चालविण्यात येत आहेत. या बस शीव -पनवेल महामार्गावरून धावणार असून शेवटची पहिली बस मध्यरात्री १२ वाजता सुरू होते आणि शेवटची बस पनवेलहून सकाळी ६.३४ आणि बेलापूरहून सकाळी ७.२६ वाजता असणार आहे.