एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण मागे महागाई भत्यासह इतर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन
मुंबई दि.१२ :- प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी कालपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. मुंबईतील आझाद मैदानात हे सुरू केले होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महागाई भत्यासह इतर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यामुळे एसटी कर्मचारी संघटनेने उपोषण मागे घेतले. तसेच १३ सप्टेंबर रोजी करण्यात येणारे राज्यव्यापी बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
फेरीवाला धोरणाचा अर्थ कुठेही व्यवसाय करावा किंवा दुकान थाटावे असा होत नाही
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ देण्याच्या मागण्याची दखल घेतली.
तसेच या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उदय सामंत यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर उदय सामंत यांच्या शासकीय निवासस्थानी सोमवारी रात्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला.