आगामी सार्वजनिक गणेशोत्सव: चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वे, पोलिसांचे नियोजन
मुंबई दि.०८ :- गणेशोत्सवाच्या निमित्ताने मध्य रेल्वेवरील चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. मध्य रेल्वे, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांकडून या गर्दीचे नियोजन करण्यात येणार आहे.
स्वच्छ हवेसाठी ठाणे देशात तिसऱ्या क्रमांकावर
लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा आदी शतकोत्तर परंपरा असलेल्या गणपतींच्या दर्शनासाठी मुंबई शहर आणि उपनगरातून हजारो भाविक गर्दी करतात. गणेशोत्सव मंडळापासून जवळचे स्थानक म्हणून चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकात प्रचंड गर्दी होते.
दहीहंडी फोडताना मुंबईमध्ये १०७ तर ठाण्यात १७ गोविंदा जखमी
चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकावर एकच फलाट असल्याने तेथे मर्यादित जागा उपलब्ध आहे. गर्दीच्या नियोजनासाठी आता स्थानकाबाहेर जाण्यासाठी आणि स्थानकात येण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहेत.
जन्माष्टमीनिमित्त राज्यपाल बैस यांची राधा गोपीनाथ मंदिराला भेट
गणेशोत्सव काळात रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दलासह महाराष्ट्र सुरक्षा दल आणि होमगार्ड अशा सुरक्षा यंत्रणांचा फौजफाटा सज्ज ठेवण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारावरील तिकीट खिडकी, फलाट आणि पादचारी पुलावरही कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.