उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांना अटक न केल्यास देशभर आंदोलन – हिंदू जनजागृती समिती
मुंबई दि.०८ :- विश्वबंधुत्वाची शिकवण देऊन सर्वांना सामावून घेणार्या ‘सनातन धर्मा’ची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची भाषा करणारे तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तामिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ते सर्वजण आपल्या वक्तव्यांवर ठाम आहेत. या सर्वांंवर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून अटक करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
समितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन सादर केले असून अटकेची कारवाई झाली नाही, तर देशभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. देशातील विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत झाल्यानंतर त्यातील सहभागी काही पक्षांकडून सनातन धर्माला लक्ष्य करण्याची चढाओढ लागली आहे. कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालून देशाची एकता, अखंडता आणि शांतता धोक्यात आणली जात आहे. तसेच मंत्री आणि खासदार या संवैधानिक पदावर असलेल्या विविध जबाबदार व्यक्तींकडून अशा प्रकारची वक्तव्ये होणे, हा लोकशाहीचा पराभव आहे.
स्वच्छ हवेसाठी ठाणे देशात तिसऱ्या क्रमांकावर
इस्लाम, ख्रिस्ती आदी धर्मांविषयी वक्तव्ये करणाची हिंमत या राजकीय पक्षांमध्ये वा त्यांच्या नेत्यांमध्ये आहे का? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे. हिंदूंना लक्ष्य करणार्या अशा कायदाद्रोही लोकप्रतिनिधींनी केवळ मंत्रीमंडळातून नव्हे, तर विधीमंडळ आणि संसद यांतूनच बडतर्फ केले पाहिजे. इतर वेळेला हिंदूंच्या विरोधात तत्परतेने ‘हेट स्पीच’चे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले जातात; मात्र अनेक दिवस अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन सनातन धर्माविषयी वक्तव्ये होत असतांना सर्वाेच्च न्यायालयानेही याविषयी ‘सुमोटो’ कारवाई केलेली नाही, हे दुर्दैवी असल्याचे समितीचे म्हणणे आहे.