ठळक बातम्या

स्वच्छ हवेसाठी ठाणे देशात तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली दि.०८ :- केंद्रीय पर्यावरण हवामान बदल आणि मंत्रालयातर्फे स्वच्छ हवा सर्वेक्षणात ठाणे शहराला देशात तिसऱ्या क्रमांक मिळाला आहे. २०० पैकी १८५.२ गुण मिळवून ठाणे शहराला मिळाले. मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भूपेंद्र यादव यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना ५० लाख रुपयांचे पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कार प्रदान केला.

दहीहंडी फोडताना मुंबईमध्ये १०७ तर ठाण्यात १७ गोविंदा जखमी

पहिल्या क्रमांकावर इंदूर शहराने आपले स्थान कायम राखले असून आग्रा शहराला दुसरा क्रमांक मिळाला आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागांतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी १३१ शहरांची निवड करण्यात आली. प्रत्येक गटातील तीन सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना रोख पारितोषिके देण्यात आली. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरांनी केलेल्या कृतींचे मूल्यमापन करून क्रमांक देण्यात आले. इंदूरने १८७ आणि आग्रा शहराने १८६ गुण मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *