रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील दोन एफआयआर रद्द
मुंबई दि.०८ :- भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदविलेले दोन एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. त्यामुळे रश्मी शुक्ला यांना सरकारने क्लीनचीट दिली आहे. विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता.
उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांना अटक न केल्यास देशभर आंदोलन – हिंदू जनजागृती समिती
या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्याने रश्मी शुक्ला यांच्याविरोधात एक एफआयआर पुण्यात तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड करण्यात आले होते.
क्लोजर रिपोर्टदरम्यान, पुणे फोन टॅपिंग प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारने मंजुरी देण्यास नकार दिला होता.