म्हाडा मुंबई मंडळांच्या सोडत: विजेत्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत सदनिकेच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम भरणे अनिवार्य
मुंबई दि.०६ :- म्हाडा मुंबई मंडळाच्या ४ हजार ०८२ घरांच्या सोडतीतील ३ हजार ५१५ पात्र विजेत्यांना ऑनलाईनद्वारे तात्पुरती देकार पत्रे वितरित करण्यात आली. या पत्रानुसार विजेत्यांना ४५ दिवसांत (१९ ऑक्टोबरपर्यंत) सदनिकेच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे.
म्हाडाच्या इतिहासात पाहिल्यांदाच सोडतीनंतर २० दिवसांत रक्कम भरून घेऊन घरांचा ताबा देण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महापालिका पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करणार
विजेत्यांना २५ टक्के रक्कम इतक्या कमी कालावधीत जमा करणे किंवा गृहकर्ज उपलब्ध करून घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक विजेत्यांनी ४५ दिवसात १० टक्के, तर उर्वरित ६० दिवसात ९० टक्के रक्कम भरण्याची मुभा देण्याची मागणी केली होती. मात्र म्हाडाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आता ४५ दिवस आणि त्यापुढे अतिरिक्त १५ दिवसांची मुदतवाढ मिळाल्यास या कालावधीत २५ टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. अन्यथा घर रद्द होईल, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विनामूल्य लेझीम प्रशिक्षण कार्यशाळा
दरम्यान समाज माध्यमांवर म्हाडाने ४५ दिवसांत १० टक्के रक्कम भरण्याची मुभा दिल्याचा संदेश फिरत आहे. ही माहिती चुकीची असून विजेत्यांना १० टक्के रक्कम भरून केवळ गृहकर्जासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्याची मुभा देण्यात आली आहे. उर्वरित १५ टक्के रक्कम विहित मुदतीत (४५ दिवसात) भरावी लागणार आहे. अन्यथा घर रद्द होण्याची शक्यता आहे, असे म्हाडा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.