ठळक बातम्या

मुंबई शहर आणि उपनगरात उद्या दहिहंडी उत्सव; सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त

मुंबई दि.०६ :- मुंबई शहर आणि उपनगरात उद्या ७ सप्टेंबर रोजी दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सव शांततेत पार पडावा यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. दहिहंडी उत्सवासाठी सरकारने घातलेल्या अटी, नियमांचे उल्लंघन न करण्याच्या सूचना देत, गोविंदांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच दहीहंडी उत्सवातील गर्दीत साध्या वेशातील पोलीस सहभागी होणार असून परिसरात घडणाऱ्या सर्व घटनांवर त्यांचे बारीक लक्ष असणार आहे.

बृहन्मुंबई महापालिका पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करणार

वाहतुकीचे नियोजन करण्याासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर तैनात राहणार आहे. दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असून, शहरातील तब्बल पाच हजार सीसी टीव्ही कॅमऱ्यांसह टेहळणी मनो-याच्या मदतीने पोलीस सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि जवानांसह केंद्रीय व राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक, राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), शिघ्रकृती दल, फोर्सवन, बॉम्ब शोधक व नाशक पथक तैनात ठेवण्यात आले आहेत.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विनामूल्य लेझीम प्रशिक्षण कार्यशाळा

महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस गर्दीत सहभागी होणार आहे. त्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. सुरक्षेसह छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी निर्भया पथकाला विशेष आदेश देण्यात आले असून महिलांना पाहून अश्लील टिप्पणी करण्याबरोबरच, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, फुगे उडविणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *