बृहन्मुंबई महापालिका पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करणार
मुंबई दि.०६ :- बृहन्मुंबई महापालिकेने पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईत महापालिकेच्या १४ सीबीएसई शाळा सुरू आहेत. जोगेश्वरी (पूर्व) येथील पूनम नगर परिसरात २०२० साली मुंबई पब्लिक स्कुलमध्ये पहिली सीबीएसई शाळा सुरू करण्यात आली. मिळालेला प्रतिसादामुळे महापालिकेने आर्थिकदृट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी मुंबईत अन्य ठिकाणीही बीएससीच्या शाळा सुरू करण्याचे ठरवले होते.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विनामूल्य लेझीम प्रशिक्षण कार्यशाळा
महानगरपालिकेने २०२१ मध्ये आणखी १० ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू केल्या. तसेच आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज आयजीसीएसई या बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू करण्यात आली. या शाळांनाही प्रतिसाद वाढल्यामुळे गेल्यावर्षी महानगरपालिकेने सीबीएसई शाळेतील छोटा शिशू व बालवाडी वर्गाची एकेक तुकडी वाढवली होती. त्यामुळे ९६० जागा वाढल्या होत्या.
प्लास्टिकविरोधी कारवाईत आत्तापर्यंत २४ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये केंद्रीय व आंतराष्ट्रीय मंडळाच्या शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांचा ओघ वाढला आहे. अन्य मंडळांच्या खाजगी शाळांचा खर्च परवडत नसल्यामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलांना त्या शाळांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांना पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.