Skip to content
मुंबईकर १६४ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड थकित
मुंबई दि.०४ :- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई चलन प्रणालीद्वारे आकारण्यात येणारा दंड भरण्यास वाहनचालक टाळाटाळ करत आहेत. मुंबईकर वाहनचालकांनी १६४ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड थकविला आहे. जानेवारी ते जुलै २०२३ या ७ महिन्यांतील ही आकडेवारी आहे. संपूर्ण मुंबईतील एकूण दंडाची रक्कम २१५ कोटी रुपये इतकी आहे.
२०१९ पासून ई-चलन प्रणाली लागून करण्यात आली. ई- चलन यंत्राद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंड आकारला जातो. तो संबंधित वाहनमालकाच्या नावावर जमा होतो. वाहतूक पोलिसांच्या ‘महाट्रॅफिक’ या अॅपवर जाऊन तो १४ दिवसांत ऑनलाइन भरायचा असतो. मात्र, वाहनचालक दंड भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.