Skip to content
मुंबई दि.०४ :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ३.४४२ किमी लांबीच्या ‘अंधेरी पूर्व ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ’ मार्गिकेवरील २.४९ किलोमीटर लांबीच्या दुहेरी भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे.
हे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. या मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर अंधेरी येथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवघ्या काही मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. मार्गिकेत एयरपोर्ट कॉलनी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा केवळ दोनच मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
ही मार्गिका सुरुवातीला उन्नत असणार असून पुढे शेवटपर्यंत भुयारी असणार आहे. भुयारी आणि उन्नत मेट्रोमधून प्रवास सुलभतेने व्हावा यासाठी जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे १२ ते २८ मीटर इतके खोल भुयारीकरण (बोगदा) करण्यात येणार आहे.