स्थानीय लोकाधिकार समितीमुळे ९० हजार मराठी माणसांना बँकांमध्ये नोकरी मिळाली – मुख्यमंत्री शिंदे
मुंबई दि.०४ :- शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या चळवळीमुळे १९८० च्या दशकात मुंबईतील सुमारे ९० हजार मराठी माणसांना बँकांमध्ये नोकरी मिळाली. लोकाधिकार समितीच्या ३२५ शाखा हे शिवसेनेचे बलस्थान होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे केले.
मुष्टियुद्ध स्पर्धेत ६० शाळांमधून ५४० विद्यार्थ्यांचा सहभाग
उत्तर -पश्चिम मुंबईचे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी लिहिलेल्या ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश- उपमुख्यमंत्री अजित पवार
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत आदी यावेळी उपस्थित होते. सत्ता नसताना मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेच्या लोकाधिकार संघटनेने केलेले कार्य ऐतिहासिक आहे. मराठी माणसांमध्ये शिवसेना वाढण्यासाठी या चळवळीचा उपयोग झाला. अतिशय शिस्तबद्ध अशी ही चळवळ होती, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.