खेळ

मुष्टियुद्ध स्पर्धेत ६० शाळांमधून ५४० विद्यार्थ्यांचा सहभाग

मुंबई दि.०४ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत क्रीडा उपविभागातर्फे चेंबूर येथे मुष्टियुद्ध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन वयोगटात ११ वजनी गटात पार पडलेल्या स्पर्धेत ६० शाळांतून ५४० विद्यार्थी सहभागी झाले होते.

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रेला सुरुवात

स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक सुनीलदत्त माने यांच्या हस्ते झाले. छत्रपती पुरस्कार विजेते सौरव लेनेकर आणि राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू जयदीप भिवंडकर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक अनिल सनेर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *