Skip to content
मुंबई दि.३१ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी आम्ही देशभक्त ‘इंडिया’चे लोक एकत्र आलो आहोत. इंडिया को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज येथे केले.
देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची आजपासून दोन दिवसांची बैठक मुंबईत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. राहुल गांधी यांच्या झंझावातामुळे देश बदलतोय, देशातलं वातावरण बदलतंय. राहुल गांधी हे देशाचं निर्विवाद नेतृत्व आहे.