टिळकनगर विद्या मंदिर शाळेत रक्षाबंधन साजरे
डोंबिवली दि.३१ :- टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळकनगर विद्या मंदिर शाळेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. कला विषयाच्या तासाला इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींनी राख्या तर विद्यार्थ्यांनी भेटकार्ड तयार केली.
मोदी यांच्या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी आम्ही देशभक्त ‘इंडिया’चे लोक एकत्र – संजय राऊत
त्यानंतर वर्गांमधून मुलींनी मुलांना राख्या बांधून, तर मुलांनी मुलींना भेटकार्ड देऊन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या अंगी हस्तकलेचे कौशल्य निर्माण व्हावे या हेतूने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम कला शिक्षिका लिना ठाकूर आणि इतर सर्व कला शिक्षकांच्या सहकार्याने राबविण्यात आला.