Skip to content
डोंबिवली दि.३० :- आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे सामाजिक भान विद्यार्थ्यांमध्ये यावे यासाठी लोकमान्य गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी आज विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना राखी बांधून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.
लोकमान्य गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी रामनगर वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष, टिळक नगर पोलीस ठाणे, पेंढरकर महाविद्यालयाजवळील टपाल कार्यालय, अग्निशमन दल, पेट्रोल पंप, रिक्षा तळ, ऑर्थोवेद आणि गोखले रुग्णालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कर्मचारी, पोलीस, रिक्षाचालक, डॉक्टर, परिचारिका यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली.
लोकमान्य गुरुकुलाच्या मुख्याध्यापिका अर्चना पावडे, पर्यवेक्षक शांताराम बोरसे, उपक्रम प्रमुख व्यंकटेश प्रभुदेसाई, शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांबरोबर स्वतंत्र गट करून या ठिकाणी गेले होते.