राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर; शिक्षक दिनी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई, दि. १ –
वर्ष २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
लोकमान्य गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे अनोखे रक्षाबंधन
वर्ष २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली.
राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार प्राथमिक प्रवर्गात ३७, माध्यमिक प्रवर्गात ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) १९, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ, विशेष शिक्षक कला/ क्रीडा दोन, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक एक आणि स्काऊट गाईड साठी दोन असे एकूण १०८ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
——-