Skip to content
मुंबई दि.२९ :- मोरा ते मुंबई दरम्यानच्या जलमार्गातील तिकीट दरात येत्या १ सप्टेंबरपासून २५ रुपयांची कपात करण्यात येणार आहे. याचा या मार्गावरील हजारो प्रवाशांना लाभ होणार आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या पावसाळी हंगामासाठी मोरा ते मुंबई जलप्रवासाचे दर २५ रुपयांनी वाढविण्यात आले होते.
त्यामुळे एका फेरीचा ८० रुपये असलेला दर १०५ रुपये झाला होता. तीन महिन्यांपासून पावसाळी हंगामात बंद करण्यात आलेली रेवस – भाऊचा धक्का हा सागरी जलमार्गही १ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. ऐन गणपती सण जवळ असताना सुरू होणाऱ्या प्रवासी वाहतूकमुळे अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची सोय होणार आहे.
दरम्यान उरणच्या करंजा ते अलिबागमधील रेवस दरम्यानच्या जलप्रवासाचे दर वाढविण्याची मागणी वाहतूकदारांनी केली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास महागण्याची शक्यता आहे.