Skip to content
ठाणे दि.२९ :- ठाण्यात येत्या येत्या १ सप्टेंबरपासून सकाळ आणि रात्र अशा दोन सत्रात रस्त्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी रस्ते सफाईच्या कंत्राटातील अटी शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत.
नव्या नियोजनानुसार सकाळ आणि रात्र अशा दोन सत्रात रस्ते स्वच्छतेसह वेळ, साधने यात बदल करण्यात आला आहे. दररोज सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचे काम सुरू होणे आणि सकाळी ८.३० वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण केली जाणे अपेक्षित आहे. त्यानंतर अंतर्गत रस्ते साफ केले जाणार आहे.
तसेच दुपारी चार ते रात्री १२ या वेळेत दुसऱ्या टप्प्यातील साफसफाई केली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सफाईच्या कामासाठी एकूण २३ गट कार्यरत आहेत. त्यात आता ओवळा भागासाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे.