महापालिकेतर्फे चेंबूर येथील आचार्य उद्यानात मियावाकी जंगल
मुंबई दि.२९ :- बृहन्मुंबई महापालिकेतर्फे चेंबूर (पूर्व) येथील म्हैसूर कॉलनी परिसरातील शरद नारायण आचार्य उद्यानामध्ये मियावाकी पद्धतीने शहरी जंगल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते याची सुरुवात झाली. दोन हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रामध्ये ४८ देशी प्रजातीच्या १० हजार २६४ रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड; वाहतूक विस्कळीत, स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी
यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरू, बदाम, रिठा, शीसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब आदी विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. मुंबईतील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी विविध ठिकाणी मियावाकी पद्धतीच्या नागरी वनांची महापालिकेतर्फे लागवड करण्यात येत आहे.