Skip to content
मुंबई दि.२८ :- विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीत आघाडीच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण करण्यात येणार आहे. येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला ही बैठक मुंबईत होणार आहे.
मुंबईतील बैठकीत राज्यनिहाय जागावाटप आणि समन्वयावर चर्चा करण्यात येणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील शरद पवार गटाकडे मुंबईतील बैठकीचे यजमानपद आहे. १ सप्टेंबरला दुपारी चार वाजता इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे.