Skip to content
नवी मुंबई दि.२८ :- नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ करण्यात आली आहे. यंदा १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
मंडप उभारणी परवानगीकरिता अर्ज महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे http://www.rtsnmmconline.com या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावयाचे आहेत.
नवी मुंबई महापालिकेने मंडप उभारण्याची परवानगी देण्याची ‘ई सेवा संगणक प्रणाली’ सुरू केली असून १९ ऑगस्ट पासून मंडळांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे.