कल्याण दि.२८ :- मुंबई रिव्हर मार्च टीम आणि वालधुनी नदी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वालधुनी नदीचे संवर्धन करण्यात येणार आहे. समितीच्या सदस्यांनी वालधुनी परिसराला भेट देऊन पाहणीही केली.
या नदीचे पाणी विविध गावांतून अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी, रिलायन्स इमारत प्रकल्प, प्राचीन शिवमंदिर, वडोळ गाव एमआयडीसी, उल्हासनगर रेल्वे स्थानकमार्गे कल्याणच्या खाडीत मिळते. रासायनिक कारखाने, नाले, गटारे, मलनिःसारण वाहिन्यातील पाणी नदीत मिसळू लागल्याने पाणी दुषित झाले आहे.