ठळक बातम्या

कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ आणि शीतगृह उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.२२ :- कांदा प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ वाढविण्यात येणार आहेत. राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा २४१० रुपये क्विंटल दराने नाफेड खरेदी करणार असून हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
निर्यातीसाठी कंटेनरमध्ये असलेला कांदाही नाफेड खरेदी करणार असून गरज भासल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य करण्याची ग्वाही गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. लासलगाव, मनमाड, आळेफाटा तसेच नाशिक जिल्ह्यातील इतर ठिकाणीही नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
कांदा साठवणुकीसाठी शीतगृहांची आवश्यकता आहे. कांद्याची महाबँक संकल्पनाही राबविण्यात येत असून यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती निर्णय घेण्यात घेणार आहे. तेरा ठिकाणी कृषक समृध्दी प्रकल्प उभारण्यात येणार असून याठिकाणी रब्बी कांदा पिकासाठी १० लाख टन शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक क्षमता उपलब्ध करुन दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
घोडबंदर रस्त्यावर अवजड वाहतुकीला तीन महीने बंदी
तर कांदा चाळींसाठी वाढीव निधीची तरतूद केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. केंद्र शासनाच्या ‘ऑपरेशन ग्रीन’ अंतर्गत अहमदनगर क्लस्टरमध्ये, राहुरी येथे हिंदुस्तान ॲग्रो को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, या २५ हजार शेतकरी सभासद असणाऱ्या संस्थेच्या कांदा प्रकल्पासाठी ११७ कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. हा प्रकल्प तातडीने राबविण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *