* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> घोडबंदर रस्त्यावर अवजड वाहतुकीला तीन महीने बंदी – मुंबई आसपास मराठी
वाहतूक दळणवळण

घोडबंदर रस्त्यावर अवजड वाहतुकीला तीन महीने बंदी

अवघड वाहनांच्या अपघातामुळे वाहतूक कोंडी
ठाणे दि.२२ :- घोडबंदर रस्त्यावर अवजड वाहतुकीला तीन महीने प्रवेशबंदी करण्याबाबतचच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडे पाठविला होता. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत. या कामासाठी नऊ कोटी ५० लाख खर्च येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केईएम रुग्णालयास अचानक भेट – रुग्ण आणि नातेवाईकांशी संवाद
मुंबई, गुजरात आणि उरण येथील जेएनपीटी बंदरातील अवजड वाहतूकीसाठी घोडबंदर घाट रस्ता महत्त्वाचा मानला जातो. मात्र तो खराब झाल्याने अवजड वाहने उलटून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक शाखेची परवानगी मिळताच त्याच्या दुरुस्तीला सुरूवात होणार आहे.
पंतप्रधान कार्यालयामार्फत प्राप्त झालेल्या तक्रारी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत निकालात काढण्याचे आदेश
घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट आणि चेना पूल परिसरातील रस्ता चढ-उताराचा आहे. हा रस्ता उंच-सखल झाल्याने वाहन उलटून अपघात होत आहेत. त्याचबरोबर चढणीच्या भागांत अनेक अवजड वाहने बंद पडतात. यामुळे या मार्गावर मोठी कोंडी होते. त्याचा परिणाम ठाणे शहरातील वाहतुकीवर होतो. त्यामुळे अवघड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. दरम्यान या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद केल्यानंतर भिवंडी शहर आणि मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *