मुंबई दि.२२ :- भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट )मुंबई प्रदेशातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर वांद्रे येथील रंगशारदा सभागृह आयोजित करण्यात आले होते. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे यांनी शिबीरात मार्गदर्शन केले.
आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन आठवले यांनी केले. बृहन्मुंबई महापालिका आगामी निवडणुकीत भाजप, शिवसेना, भारिप महायुतीचे १५० नगरसेवक निवडून येतील, यात रिपाईचे १५ नगरसेवक असतील, असे आठवते म्हणाले. भारिपचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजभाऊ सरवदे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आदी यावेळी उपस्थित होते.