Skip to content
मुंबई दि.२१ :- महाराष्ट्रातील लहान मंदिरेच नव्हे, तर अनेक मोठ्या मंदिरांमध्येही वारंवार चोर्या होण्याच्या घटना घडत आहेत. आता तर ‘सीसीटीव्ही’ लावलेल्या आणि अनेक सुरक्षा रक्षक असलेल्या मंदिरांमध्येही चोर्या होण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.
त्यामुळे पोलीस प्रशासनावर अवलंबून न रहाता आता मंदिर व्यवस्थापनाने देवनिधीचे रक्षण करण्यासाठी सक्षम सुरक्षा व्यवस्था उभी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी व्यक्त केले.
मंदिर व्यवस्थापनाने केवळ सुरक्षा रक्षक वा सीसीटीव्ही कॅमेरे लावले म्हणजे आता चोर्या होणार नाहीत, या भ्रमात राहू नये.
मशीद, चर्च, गुरुद्वारा वा अन्य धर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये चोर्या झाल्याच्या बातम्या कधी ऐकायला येत नाहीत; मग केवळ हिंदूंच्या मंदिरांमध्येच चोर्या का होतात ? देवनिधी सुरक्षित ठेवणे, हे मंदिर व्यवस्थापनाचे आणि भक्तांचेही कर्तव्य आहे. हिंदू समाजाने मंदिरांतील चोर्यांविषयी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. तसेच महाराष्ट्र शासनानेही मंदिरातील चोर्यांच्या संदर्भात एक धोरण आखून या चोर्यांना प्रतिबंध केला पाहिजे, असेही घनवट यांनी सांगितले.b