साहित्य- सांस्कृतिक

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण

डोंबिवली दि.२२ :- टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येत्या २९ सप्टेंबर रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मंडळाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात झालेल्या कार्यक्रमात बोधचिन्ह प्रकाशित करण्यात आले. हे बोधचिन्ह टिळकनगरयेथील ज्येष्ठ कलाकार दत्ता म्हेत्रे यांनी तयार केला आहे.
मंदिरांतील चोर्‍या रोखण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी
गणेश मंदिराचे विश्वस्त प्रवीण दुधे, श्रीपाद कुलकर्णी, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यावेळी उपस्थित होते. अमृतमहोत्सवी वर्षात मंडळातर्फे वर्षभर अनेकविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु झाले आहे. जून्या टिळकनगरवासियांचे आणि टिळकनगरातील माहेरवाशीणींचे संम्मेलनही आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातात तीन जण ठार
अमृतमहोत्सवी गणेशोत्सवाचे औचित्य साधून जून्या आठवणी संकलीत करुन स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी त्यांच्याशी ९८२०८९२०१८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा,, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *