ठळक बातम्या

गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी कार्यवाहीला गती द्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.२१ :- गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. रांजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची सोडत प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. सह्याद्री अतिथीगृह येथे गिरणी कामगारांच्या प्रश्नांसदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातात तीन जण ठार
मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, गोविंदराज, एमएमआरडीएचे मुख्य नियोजनकार मोहन सोनार यांच्यासह गिरणी कामगारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. गिरणी कामगारांना त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली पाहिजे ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे.
गणेशोत्सव सजावट स्पर्धेत यंदा ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’
त्यासाठी कार्यवाहिला गती देण्यात आली असून गेल्या काही महिन्यात दोन टप्प्यात गिरणी कामगारांना सदनिकेचे चावी वाटप करण्यात आले आहे. सुमारे १ लाख ७४ हजार अर्ज गिरणीकामगार, त्यांच्या वारसांनी म्हाडाकडे केले आहेत. त्याची छाननी प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुंबईत टेक्स्टाईल मिल म्युझियमचे काम तातडीने सुरू करावे अशा सुचना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. याठिकाणी गिरणी कामगारांच्या मुला-मुलींना काम देण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *