Skip to content
मुंबई दि.२० :- शास्त्र, नैतिकता, धर्म, न्याय, राष्ट्रशिक्षण, सण, उत्सव यांविषयी प्रबोधन करून ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे समाज घडविण्याचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांनी काल येथे केले. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त माटुंगा (प.) येथील लक्ष्मीनारायण बाग सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्र आणि धर्म यांच्या पुनरुत्थानासाठी वैचारिक बैठक सिद्ध करणे हाच ‘सनातन प्रभात’चा केंद्रबिंदू आहे , असे ‘सनातन प्रभात’च्या उपसंपादक रुपाली वर्तक यांनी सांगितले. तर ‘हिंदु राष्ट्रा’चा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यामध्ये ‘सनातन प्रभात’चे विशेष योगदान असल्याचे सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत म्हणाल्या.
‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन अंकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ‘सनातन प्रभात’ची वैशिष्टये सांगणारी ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. सनातन प्रभातच्या युट्यूब वाहिनीवरून या सोहळ्याचे थेट प्रसारण करण्यात आले. ‘सनातन प्रभात’च्या काही वाचकांनीही मनोगत व्यक्त केले. ‘सनातन प्रभात’ कक्ष, विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शन कार्यक्रमस्थळी करण्यात आले होते.