Skip to content
डोंबिवली दि.२० :- ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न ब्राह्मण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज डोंबिवलीत सामुहिक श्रावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण समाज एकत्रिकरणाच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून हा कार्यक्रम पार पडला.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, चित्तपावन ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ, काण्व परिषद आणि ब्राह्मण सभा तसेच पुरोहित मंडळ, देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळ या संस्थानी एकत्र येऊन कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाच्या समाज मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
२२५ हून अधिक सदस्य श्रावणी कार्यक्रमात सहभागी झाले होते. ऋग्वेदी, कृष्ण यजुर्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी पद्धतीने श्रावणी अत्यंत विधिवत प्रकारे करण्यात आली. भविष्यात अश्या प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन ब्राह्मण महासंघातर्फे डोंबिवलीत करण्यात येणार असल्याचे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष मानस पिंगळे यांनी सांगितले.