Skip to content
मुंबई दि.१६ :- काँग्रेस कोअर कमिटीच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत मतदारसंघाचा आढावा आणि मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’च्या बैठकीवर चर्चा झाली, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे दिली. एमसीए क्लब येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी पटोले बोलत होते.
राज्यात ३ सप्टेंबरपासून पदयात्रा सुरु होत असून या पदयात्रेची रुपरेषा ठरवण्यात आली. ४८ लोकसभा मतदारसंघातील निरिक्षकांच्या अहवालावर तसेच काँग्रेस कोअर कमिमीच्या बैठकीत मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसंदर्भातही चर्चा झाल्याचे पटोले यांनी सांगितले.
बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या दोन प्रतिनिधींसह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.