मुंबई दि.१६ :- मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मुलुंड (पूर्व) शाखा आयोजित श्रावणोत्सवाच्या निमित्ताने ‘माझा श्रावण’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘माझा श्रावण’ निबंध स्पर्धेत श्रावणाविषयीचे व्यक्तिगत अनुभव, आठवणी, विचार अपेक्षित आहेत. निबंध सुवाच्य अक्षरात पानाच्या एकाच बाजूला लिहिलेला असावा, निबंधाच्या पहिल्या पृष्ठावरच आपले नाव पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक अवश्य लिहावा.
निबंध मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मुलुंड पूर्व शाखेमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत आणून द्यावेत. (रविवारी सकाळी अकरपर्यंत .सोमवारी शाखा बंद.) किंवा डॉ.भारती निरगुडकर 9892499645/ अवंती महाजन 9769266798 यांच्या या क्रमांकावर व्हॉट्स अप करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. निबंधाची शब्दमर्यादा आठशे ते एक हजार शब्द अशी असून निबंध पाठविण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट आहे. विजेत्या स्पर्धकांना श्रावणोत्सव कार्यक्रमात निबंध वाचण्याची संधी देण्यात येणार आहे.