Skip to content
मुंबई दि.१५ :- मुंबई अग्निशमन दलातील ५ जवानांना राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदकप्राप्त जवानांची यादी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘अग्नि सेवा, नागरी सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालय’ स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केली.
मुंबई अग्निशमन दलातील प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र नारायणराव आंबुलगेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी दीपक कालीपद घोष, दुय्यम अधिकारी सुनील आनंदराव गायकवाड, प्रमुख अग्निशामक पराग शिवराम दळवी, अग्निशामक तातू पांडुरंग परब यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील आठ जवानांना राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे.