Skip to content
मुंबई दि.१५ :- व्यवसायासाठी परवाना देण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करून या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने नऊ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. महापालिकेतर्फे नागरिक तसेच व्यावसायिकांना विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी अनुज्ञापन (परवाना) देण्यात येते.
परवाना देण्याच्या प्रक्रियेत अडचणी येतात, परवाने विहित मुदतीत मिळत नाहीत, अशा तक्रारी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांना प्राप्त झाल्या होत्या.
त्यामुळे, आयकर किंवा पारपत्र विभागामध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेच्या धर्तीवर परवाना देण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या संदर्भात नागरिकांच्या काही सूचना असतील तर येत्या २० ऑगस्टपूर्वी chief.bdd@mcgm.gov.in या इ मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.